Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आम्ही छत्रपतींच्या राज्यातील पोरं आहोत…’एक जीव वाचवणाऱ्या पोलिसांचे गौरवोद्गार……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

आम्ही छत्रपतींच्या राज्यातील पोरं आहोत…’एक जीव वाचवणाऱ्या पोलिसांचे गौरवोद्गार……*

बुधवारी (23 मार्च) दुपारी साधारण अडीच वाजता विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर कुमार पुजारी या युवकाने रेल्वे रुळावर उडी मारली.ऋषीकेश माने त्यावेळी प्लॅटफॉर्मवर गस्त घालत होते. एक तरुण अचानक रुळावर उतरल्याचं माने यांनी पाहिलं. त्याच वेळी समोरुन मदुराई एक्सप्रेस येत होती. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या पाच सेकंदात ऋषीकेश माने रेल्वे रुळावर उतरले.माध्यमांशी बोलताना ऋषीकेश माने म्हणाले, “मी पोलीस आहे. सर्वांना मदत करणं पोलिसांचं कामच आहे. मला वाटलं नव्हतं हा मुलगा उडी मारेल. पण त्याने उडी मारली. काही सेकंद मी थांबलो तेव्हा समोरुन येणाऱ्या गाडीचा अंदाज घेत होतो.”

‘आम्ही छत्रपतींच्या राज्यातील पोरं आहोत…’

समोरुन एक्सप्रेस येत असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून तुम्ही कुमार पुजारी यांचे प्राण वाचवले, तुम्हाला भीती वाटली नाही का?

या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “आम्ही छत्रपतींच्या राज्यातली पोरं आहोत त्यामुळे असं काही वाटलं नाही.रेल्वे पोलिसांकडून ऋषीकेश माने यांना 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. तसंच राष्ट्रपती पदक प्रस्तावासाठी ही केस पात्र ठरेल का यावरही आम्ही काम करतोय असंही पोलीस आयुक्त खालिद म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे