बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात खर्डी जवळ रूम मध्ये चुकून बेडरूम लॉक होऊन भयभीत झालेल्या मुलाला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले..

अमित जाधव - संपादक

♦दिनांक ०१/०६/२०२४ रोजी ००:४४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- दिवा बीट अग्निशमन केंद्र)* साई सृष्टी अपार्टमेंट, दिवा-शीळ रोड, खर्डी गाव, दिवा,ठाणे या ठिकाणी साईसृष्टी अपार्टमेंट, बी-विंग,*(तळ+०५ मजली इमारत) या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक:-२०५ (मालक:- श्री. निलेश बेटकर)* या रुममधील बेडरूमचा दरवाजा लॉक होऊन रूममध्ये *कु. मयंक निलेश बेटकर (पु/. वय- ०९ वर्षे)* हा मुलगा अडकला होता. *सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुमारे ००:१० मिनिटानंतर सदर रूमचा दरवाजा डोअर ब्रेकरच्या सहाय्याने उघडुन मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे