Breaking
ब्रेकिंग

दिवा सी एस एम टी रेल्वे बेमुदत अंदोलन मागे, अश्विनी अमोल केंद्रे यांनी दिवेकरांसाठी थोटावले कोर्टाचे दार केली याचिका दाखल….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 4 4

 

दिवा (ठाणे), दिनांक: २९ जुलै २०२५ रोजी प्रत्यक्ष भेटून मध्य रेल्वेचे अधिकारी,पोलिस प्रशासन यांच्या मध्यस्थीने तसेच अमोल धनराज केंद्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित..

दिवा जंक्शन ते CSMT लोकल सेवा सुरू करण्यासाठी कित्तेक वर्षा पासून निवेदन,हजारो प्रवाशांनी स्वाक्षरी मोहीम घेऊन निवेदन,मोर्चा,ढोल बजाव आंदोलन करून ७ दिवस आमरण उपोषण केले त्यावेळीही पुढच्या वर्षी पर्यंत लोकल चालू होईल असे सांगण्यात आले होते.लोकल चालू केली नाही.परंतु दिवा येथे १९ फास्ट लोकल थांबवण्यात आल्या होत्या.अमोल धनराज केंद्रे आणि सौ अश्विनी अमोल केंद्रे तसेच त्यांच्या पाठी खंबीर पने साथ देणारे सामाजिक संघटना राजकीय पक्ष,प्रवाशी माता भगिनी यांच्या मुळे शक्य झाले होते.परंतु दिवा ते CSMT लोकल चालू करण्याचा लढा पूर्ण झाला नसल्याने समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी १ जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
विशेष म्हणजे २७ जुलै रोजी आंदोलनाच्या २७ व्या दिवशी त्यांचा वाढदिवस असूनही त्यांनी तो जनहिताच्या लढ्याला वाहून दिला होता.
१ जुलै पासून लढा सुरू झाला पण रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याने अमोल केंद्रे यांच्या नेतृत्वात २० जुलै रोजी एल्गार मोर्चा काढून दोन दिवसात दखल न घेतल्यास रेल रोको करण्याचे जाहीर करताच.२२ जुलै,आणि २३ जुलै रोजी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांनी भेट घेतली.त्यावेळी पावसामुळे मंडप पडला होता.मंडपाची सहनशीलता संपली पण माझी नाही जनतेचे जीव वाचवण्यासाठी मी लढत आहे.असे रेल्वे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.रेल्वे अधिकारी आणि पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने
२४ जुलै रोजी रेल्वे मुख्यालयात झालेल्या बैठकीत पार पडली.त्यात

१). सकाळच्या वेळेत ०६:३० ते ११:३० या वेळेत दिवा जंक्शन येथे लोकल वाढवण्यास होकार दिला.

२). दिवा हे ३ एप्रिल १८६७ चे जंक्शन असूनही सर्व जलद गाड्यांना थांबा नाही.किमान कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ वरून येणाऱ्या फास्ट लोकल थांबवणे बाबत होकार दिला.त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.

३). दिवा ते पनवेल दरम्यानही मोठी लोकसंख्या राहते व प्रवास करते.या मार्गावर लोकल सेवा सुरू केल्यास नवी मुंबई, ठाणे, आणि रायगड जिल्ह्यातील अनेक प्रवाशांचे दैनंदिन जीवन सुलभ होईल.यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

४.) ९ जून रोजी मुंब्रा येथे घडलेल्या अपघातात रेल्वेची ॲम्ब्युलन्स नसल्याने अपघात ग्रस्त प्रवाश्यांना टेम्पो मध्ये टाकून नेहण्यात आले.ही दुर्दैवी घटना मध्य रेल्वे प्रबंधक यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर दिवा आणि मुंब्रा तसेच इतर प्रत्येक रेल्वे स्टेशन वर २४ तास ॲम्ब्युलन्स सेवा देण्याचे मान्य केले आहे.आणि दिवा जंक्शन साठी ज्या होतील त्या सोई सुविधा देण्याचे मान्य केले होते.

५)दिवा येथून दररोज हजारो प्रवासी कोपर,डोंबिवली, ठाकुर्ली,वरून वापस CSMT कडे प्रवास करतात. सध्या त्यांना दुसऱ्या स्थानकांवर जाऊन लोकल बदलावी लागते, दिवा CSMT लोकल चालू झाली तर दिवा ,कोपर,डोंबिवली, ठाकुर्ली येथील प्रवाश्यांना न्याय मिळेल.परंतु याबाबत स्पष्ट भूमिका घेण्यास,जनतेच्या समोर मांडण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला.जनतेच्या समोर लोकल बाबत स्पष्ट भूमिका मांडली नाही तर जनतेचा उद्रेक होईल आणि याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल.कारण निवडणूक आली की राजकीय पक्ष नेते दिवा CSMT लोकल चालू करण्याचे आश्वासन देतात.पण प्रत्यक्षात लोकल चालू होणार की नाही याबाबत रेल्वे प्रशासन गप्प का?त्यामुळे जनते समोर भूमिका स्पष्ट करावीच लागेल.असे मत शिष्टमंडळाने मांडून निवेदन दिले होते.
निवेदनावर दुसऱ्या दिवशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करू असे आश्वासन देऊनही टाळाटाळ केली.त्यामुळे केंद्रीय रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.वरील सर्व मागण्या तसेच गेल्या ११ वर्षात दिवा ते CSMT लोकल सेवा का सुरू करण्यात आली नाही.दिवा ते CSMT लोकल कधी चालू होणार.तसेच
२०१४ पासून आत्ता पर्यंत किती प्रवासी माता भगिनी वडीलधारे प्रवासी बांधवाचे विद्यार्थ्यांचे जीव गेले.त्यांना रेल्वेने मदत का केली नाही.दिवा ते CSMT स्पेशल लोकल,सर्व फास्ट लोकल थांबवणे याबाबत स्पष्ट भूमिका उच्च न्यायालयात रेल्वे प्रशासनास मांडावी लागणार आहे.यासाठी समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे नवी दिल्ली, चीफ सेक्रेटरी ऑफ रेल्वे बोर्ड,मध्य रेल्वे प्रबंधन DRM ,मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन,महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ऍडव्होकेट प्रभात दुबे सर आणि त्यांची पूर्ण टीम दिवा ते CSMT लोकल चालू करण्यासाठी तसेच इतर मागण्या बाबत लढा देणार आहे असे अमोल केंद्रे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे

ही लढाई कोणत्याही राजकीय हेतूपोटी नाही. ही सामान्य जनतेची माता, भगिनी वडीलधारे प्रवासी बांधवाचे विद्यार्थ्यांचे जीव वाचवण्यासाठी रोजच्या जगण्याशी संबंधित न्यायासाठी असताना देखील आमदार,खासदार,माजी लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनास पाठ फिरवणे ही दुर्दैवी बाब आहे.एक मराठी सामान्य महिला पाऊस वारा असतानाही स्वतःची,स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता लढत आहे. १ जुलै पासून सौ अश्विनी अमोल केंद्रे यांचे सुरू असलेलले बेमुदत धरणे आंदोलनाला आज २९ व्या दिवशी स्थगित करून यापुढे न्यायालयीन लढा लढून मागण्यांची पूर्तता करून दिवा ते CSMT लोकल दिवा शहरातील जनतेसाठी सुरू करणार असल्याचे समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे व अमोल धनराज केंद्रे यांनी सांगितले.आता रडायचे नाही तर लढायचे आता आपल्या दिवा वासियांचे जीव वाचवण्यासाठी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू करायची आहे.त्यामुळे जनतेने साथ आणि आशीर्वाद पाठीशी खंबीर पने ठेवण्याची विनंती केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे