दिवा खर्डी येथे मुंब्रा पोलिसांनी चारचाकि सह पकडला लाखो रुपये किमतीचा 22 किलो गांजा…
अमित जाधव - संपादक
पो उप नि भोसले , मु्ंब्रा पो ठाणे यांना खात्रीशीर बातमी मिळाली असता दिवा खर्डी रोड,दिवा. मुंब्रा येथे एक इसम गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे. मिळालेली माहिती वपोनी. कोल्हटकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सापळा लावुन इसम नामे रहमत खान तमिझ खान.वय. 33 वर्ष.राह.गॅलेक्सी अपार्टमेंट. रू. नं. 07. अलमास कॉलनी. सैनिक नगर. मुंब्रा.ता. जि.ठाणे.मूळ पत्ता. लाल खडी,उमर मस्जिदच्या जवळ, अमरावती. यास त्याचेकडील कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे 1) 2,75,000/- रू. किमतीचा 22 किलो गांजा.2) 2,00,000/- रू. किमतीची हुंडाई कार.3) 30,000/- रू. किमतीचे दोन मोबाईल फोन असा,एकूण 5,05,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरचा 22 किलो गांजा त्याने मोहम्मद सादिक रा .रहिमात नगर,ता.धारणी. जि.अमरावती याच्याकडून आणला असल्याचे सांगितले आहे.
नमुद बाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आहोत



