ब्रेकिंग
दिव्यात इमारतीच्या तळ मजल्यावरती असलेल्या मीटर बॉक्स रूममध्ये लागली आग..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
0
8
दिनांक ०६/०४/२०२४ रोजी २०:२९ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळाली असता पाटील कॉम्प्लेक्स, ग्लोबल शाळे समोर, अवधूत हॉलच्या बाजूला, दिवा- दातिवली रोड, दिवा, ठाणे या ठिकाणी पाटील कॉम्प्लेक्स (तळ+०७ मजली इमारत)या इमारतीच्या तळ मजल्यावरती असलेल्या मीटर बॉक्स रूममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी, टोरंट विद्युत कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.सदर घटनास्थळी तळ मजल्यावरील मीटर बॉक्स केबिन मधील एकुण ३७ मीटर बॉक्स पैकी ०३ मिटर बॉक्स व इलेक्ट्रिक वायरिंग जळाली आहे.सदर घटनास्थळी लागलेली आग स्थानिक रहिवाशांकडून विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
0
2
0
9
0
8



