बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवावासियांसाठी आणखी एक आनंदाची बाब, पश्चिमेस देखील सरकता जिना येत्या आठवड्यात सुरू,तर फलाट एक व दोन मध्ये ही सरकता जिना मंजूर…… ऍड आदेश भगत(दिवा रेल्वे प्रवासी संघटना)

अमित जाधव - संपादक

 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे* यांच्या प्रयत्नाने व *दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या* मागणीनुसार दिवा रेल्वे स्थानकात पूर्व दिशेला नवीन संचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण झाल्याने दिवेकर रेल्वे प्रवाशांमध्ये एक आनंदाचे वातावरण पसरले आहे, शिवाय रेल्वे रूळ ओलांडणे आता १००% बंद झाल्यामुळे प्रवाशांना पादचारी पुलावरून जाण्या-येण्यापासून कोणत्याही पर्याय उरलेला नाही.
आणि प्रवासी स्वतः पादचारी पुलाचा वापर करत असल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकातील अपघाताला कायमचा आळा बसणार असे चित्र तयार झाले आहे. दिवा पश्चिम येथील तयार होत असलेला सरकता जिना हा देखील लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून हा सरकता जिना येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला करणार असल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष *अँड.आदेश भगत* यांनी सांगितलं.

*प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २* वरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई दिशेकडे देखील एक स्वयंचलित सरकता जिना व्हावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून केली जात होती. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वरील सरकता जिना सुद्धा मंजूर झाला असून त्यासाठी *जागा निश्चित करण्यासाठी आज मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवा स्थानकाची पाहणी केली यावेळी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत उपस्थित होते.* दिवेकर रेल्वे प्रवाशांची गरज लक्षात घेता दिवा पश्चिमेतील सरकता जीना हा देखील लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू करावा व फलट क्रमांक १ व २ वरील नवीन सरकत्या जिन्याचं कामाला त्वरित सुरुवात करावी अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे