Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे रामदास सेवाश्रमाचे परागबुवा रामदासी यांना सिटीझन वेल्फेअर असोशिएशनच्यावतीने”सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत.

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे रामदास सेवाश्रमाचे परागबुवा रामदासी यांना सिटीझन वेल्फेअर असोशिएशनच्यावतीने”सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत. —————————————————————बदलापूर(गुरुनाथ तिरपणकर)-शहराचे अभ्यासू,प्रामाणिक,कर्तव्यनिष्ठ,धडाडीचे अधिकारी म्हणून कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी बदलापूर शहरावर यशस्वी कार्यमग्न अधिकारी छाप पाडली.त्यांचा प्रशासनाचा दांडगा अनुभव,कार्यप्रणाली,कार्यकुशलता वाखणण्याजोगी आहे.या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन सिटीझन वेल्फेअर असोशिएशनच्यावतीने प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना नगरपरिषद कार्यालयात उपाध्यक्ष विलास हंकारे यांच्या हस्ते”सन्मानपत्र”प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले.तसेच रामदास सेवाश्रम वांगणी येथील आश्रमाचे संस्थापक,रामदास सेवाश्रमाच्या माध्यमातून वनवासी क्षेत्रामध्ये आरोग्य,शैक्षणिक सेवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात.कल्याण स्वामी गौशाळेच्या माध्यमातून भाकड गोधन सांभाळून त्यांचे संगोपन रामदास आश्रमाद्वारे केले जाते.त्यांच्या या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणुन परागबुवा रामदासी यांनाही सिटीझन वेल्फेअर असोशिएशनच्यावतीने संस्थेचे उपाध्यक्ष विलास हंकारे यांच्या हस्ते”सन्मानपत्र”प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले.याप्रसंगी सचिव राजेंद्र नरसाळे,जेष्ठ सल्लागार,संस्थापक सदस्य दिलीप नारकर,सुहास सावंत हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे