Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील साबे गाव येथील जय अंबे मित्र मंडळ,जयंअबे महिला मंडळ व राजे प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या उत्साहात देवीचं आगमन,पुणेरी ढोल पथक व टाळ मृदुंगामध्ये वारकरी संप्रदाय देखील आकर्षणाचा बिंदू…..

अमित जाधव -संपादक

0 2 0 9 7 4

 

दिवा (प्रतिनिधी) जय अंबे मित्रमंडळ व जय अंबे महिला मंडळ आणि राजे प्रतिष्ठान,विठ्ठल मंदीर येथील दुर्गादेवीचे आज धुमधडाक्यात,ढोलताशे, फटाक्यांच्या आतषबाजीने आगमन झाले असून आज संपुर्ण साबे परिसर दणाणून गेला. दिवा चौक ते साबे गाव परिसर भक्तीमय झालेला पहावयास मिळाला.यावेळी या नवरात्र उत्सवाचा दिव्यातील सर्व जनतेने आनंद घ्यावा असे समाजसेविका सौ.अर्चना निलेश पाटील आणि श्री निलेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! उद्यापासून दिव्यात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन केले जाते. या वर्षी 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्र हे देवीचे व्रत असून दिव्यासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.

जय अंबे मित्रमंडळ व जय अंबे महिला मंडळ,राजे प्रतिष्ठाण यांच्यावतीने दरवर्षी दिव्यातील साबे गाव येथे नवरात्रौ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र कोरोनामुळे या गेली दोन वर्षे सर्व भाविकांना या उत्साहापासून लांब रहावे लागले होते.या वर्षी तर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी गणपती उत्सवाप्रमाणेच नवरात्रौ उत्सवही भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करा असे आवाहनही केले होते.त्यानुसार आज दिव्यातील समाजसेविका सौ.अर्चनाताई पाटील आणि श्री निलेश पाटील यांच्या पुढाकाराने दिव्यातील विविध मंडळांचा नवरात्रौ उत्सव दिमाखात साजरा होत आहे.या उत्सवात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

आज दिव्यात प्रथमच मोठ्या संख्येने दुर्गादेवीच्या आगमनासाठी उपस्थित होते.या आगमन सोहळ्यात ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी,आयोजक श्री निलेश पाटील,सौ.अर्चनाताई पाटील,अँड.आदेश भगत,श्री उमेश पाटील,माजी नगरसेवक श्री दिपक जाधव,दिवा शिवसेना उपशहप्रमुख श्री गणेशजी मुंडे,श्री गुरुनाथ पाटील आदींसह विविध मान्यवरांनी सहभाग घेतला होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे