Breaking
ब्रेकिंग

जागतिक पर्यावरण दिवस. निमित्ताने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था वृक्षारोपण कार्यक्रम…

Amit jadhav - editor

0 2 0 9 7 4

 

कल्याण प्रतिनिधी –
..5 जून 2025 जागतिक पर्यावरण दिवस.या दिवसाच्या निमित्ताने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था महाराष्ट्र ठाणे जिल्हा उपाध्यक्षा अनिता प्रविण कळसकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा कारागृह वर्ग एक कल्याण, जिल्हा ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी आवर्जून हजेरी लावली होती तसेच यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रोपे आणून सहकार्य केले.यावेळी अनिता प्रविण कळसकर यांनी २१झाडे ,चिंच,रीठा,
आपटा,सावर आणि कडूनिंब इ.मिळून 31 झाडे आधारवाडी कारागृह lपरिसरात लावण्यास मदत केली.यावेळी कारागृहाचे डीसीपी मा.एस.पी.जगताप सरांचे गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले ,तसेच कारागृहातील इतर स्टाफ ला तुळशीचे रोपं देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी नेफडोचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.प्रकाश कदम सर तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अस्मिता सावंत , राष्ट्रीय महिला सचिव आसिया मॅडम ,
ठाणे जिल्हा सचिव सौ मिरा भेंडिगीरे,
मुंबई जिल्हा उपाध्यक्ष.
ज्योती चोरगे,कल्याण जिल्हा उपाध्यक्ष
श्री.संजय निरभवणे .
अंबरनाथ तालुका अध्यक्षा सौ . पूजा प्रकाश जाधव, अंबरनाथ तालुका सचिव , सौ शशिकला मारुती दुरुगडे
अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष ,सावित्री महादेव बिरंजे,
अंबरनाथ तालुका उपसचिव,तसेच अंबरनाथ तालुका अध्यक्ष
सौ. कल्पना महादेव झेंडे ,सौ.प्रणिता भंडारवार तसेच बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष, पत्रकार व समाजसेवक श्री.सुनिल इंगळे इ.सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.यावेळी अनिता कळसकर ठाणे जिल्हा उपाध्यक्षा यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले तसेच उपस्थित सर्व स्टाफला तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.अगदी खेळीमेळीच्या व अत्यंत उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.शेवटी आधारवाडी कारागृहाचे डीसीपी जगताप सर , मुख्य व्यवस्थापक कोळी सर, पाटील आणि इतर अनेक मान्यवरांचे आभार दर्शविले.पुढच्या वेळी या ही पेक्षा जास्त झाडे या परिसरात आम्ही लावण्यास आम्ही देऊ ,असे अनिता ताईंनी आश्वासन दिले आणि कार्यक्रमाची सांगता झाली ‌.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे