बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

`गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४’चे ठाण्यात १६ फेब्रुवारी रोजी उद्घाटन,..

अमित जाधव - संपादक

ठाणे, दि. १४ (प्रतिनिधी) : प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने सुरक्षेबरोबरच सुरक्षित भविष्यासाठी स्वतःचे घर घेण्यापेक्षा अन्य उत्तम पर्याय नाही. केवळ मालमत्ता खरेदी हा दृष्टीकोन न ठेवता, तुमच्या कुटुंबाला उत्तम व आवडणारी जीवनशैली देणारे योग्य घर गृहकर्जासह उपलब्ध होण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी ठाण्यात उद्घाटन होणारा गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ हा एकमेव पर्याय आहे, अशी ग्वाही `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता यांनी आज येथे दिली. मुंबई महानगर क्षेत्रात प्रत्येक कुटुंबांच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकारण्याची वेळ आता आली असून, ठाणे शहरात उत्तम घर उपलब्ध होऊ शकेल, अशी खात्री श्री. मेहता यांनी दिली.
ठाणे पश्चिम येथील पोखरण रोड क्रमांक १ वरील रेमंड मैदानात १६ फेब्रुवारीपासून १९ फेब्रुवारीपर्यंत गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांपासून होणाऱ्या या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांबरोबरच घर खरेदी केलेल्या कुटुंबांची पसंती, नवनवीन सुविधा आणि बदलत्या जीवनशैलीनुसार प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनामध्ये घरे उपलब्ध होणार आहेत. त्यात एकाच छताखाली गृहसंकुलांबरोबरच गृह कर्जाचे पर्यायही नागरिकांना उपलब्ध असतील, असे `क्रेडाई एमसीएचआय’चे मानद सचिव श्री. मनिष खंडेलवाल यांनी सांगितले.
ठाणे येथे होणाऱ्या प्रदर्शनात ग्राहकांच्या दृष्टीकोनातून सुविधा असतील. तेथे सुरक्षित गृहसंकुलातील उत्तम घरे पाहावयास मिळतील. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गृहविषयक अतिरिक्त माहिती मिळू शकेल, असे मत `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे माजी अध्यक्ष श्री. अजय आशर यांनी सांगितले. प्रॉपर्टी प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांना रिअल इस्टेटबाबत अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार प्रदर्शनातील कॉन्फरन्स हॉलमध्ये `कल, आज और कल महारेरा’ हा परिसंवाद १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. तर `ठाणे शहराचा पुनर्विकास’ या विषयावर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कॉन्फरन्स हॉलमध्येच दुसरा परिसंवाद होईल. तसेच ठाणे शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील `स्वच्छ हौसिंग सोसायटी’ पुरस्काराचे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रोजी वितरण केले जाणार आहे, असे श्री. आशर यांनी सांगितले.
`क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ संस्थेने सर्वप्रथम १९९९ मध्ये पहिले प्रॉपर्टी आणि गृह कर्ज प्रदर्शन आयोजित केले होते. त्यानंतर ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दरवर्षी प्रदर्शनात विविध नाविन्यपूर्ण घरे सादर केली जात आहेत. या प्रदर्शनात सुरक्षित व अधिकृत घरे मिळत असल्यामुळे ग्राहकांकडूनही पसंती मिळत आहे, असे `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे खजिनदार श्री. गौरव शर्मा यांनी सांगितले.
`क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’च्या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असून, त्याचे महत्वही वाढले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहराच्या विकासानुसार रिअल इस्टेट क्षेत्रात बदल केले जात आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून प्रत्येक कुटुंबाच्या अपेक्षेनुसार सुसंगत सुविधा दिल्या जात आहेत. त्यानुसार `गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४’ मध्ये घरखरेदीसाठी इच्छूक ग्राहकांना सुरक्षित व उत्तम गृहप्रकल्प सादर केले जाणार आहेत. देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे किमान ४० लाख रुपयांपासूनच्या घरांपासून विविध किंमतीची घरे ग्राहकांना उपलब्ध होतील. त्यामुळे ठाण्यातील रेमंड मैदानावर होणारे प्रदर्शन ही घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम संधी आहे, असे ते म्हणाले.
`गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४’ प्रदर्शनाच्या माध्यमातून `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’च्या सर्व सदस्यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करून ग्राहकांपुढे उत्तमोत्तम गृह प्रकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात आकर्षक किंमतीत गृहकर्जाचे पर्यायही उपलब्ध होणार आहेत, असे प्रदर्शन समितीचे अध्यक्ष श्री. संदीप माहेश्वरी यांनी सांगितले. एकाच छताखाली अनेक पर्यायांचा लाभ, रिअल इस्टेटमधील विविध आघाडीचे ब्रँड आणि अग्रगण्य गृह वित्त पुरवठादारांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद अशी या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदर्शनातून उत्तम घर शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाला निश्चितच स्वप्नातील घर मिळू शकेल. `वर्क फ्रॉम होम’ काम करणारा नोकरदार वर्ग व उत्तम जीवनशैली जगणाऱ्या कुटुंबांसाठी ठाणे हा निवासासाठी उत्तम पर्याय आहे. नव्या पिढीच्या तरुणांच्या अपेक्षांनुसार शहरात अनेक गृहप्रकल्प साकारले आहेत. या प्रदर्शनात विविध किंमतीतील अशी अनेक घरे ग्राहकांना पाहता येतील, असे श्री. माहेश्वरी यांनी सांगितले.


`क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्या प्रदर्शनात, प्रत्येक कुटुंबाच्या व ग्राहकाच्या अपेक्षेनुसार विविध प्रकारच्या गरजांनुसार उभारलेल्या गृहप्रकल्पातील घरे उपलब्ध असतील, असे `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता यांनी सांगितले. उत्तम, नव्या पद्धतीच्या आणि नाविन्यपूर्ण शैलीच्या घराच्या शोधात असलेल्या कुटुंबासाठी `गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४, ठाणे’ हा विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. मुंबई महानगर प्रदेशात उत्तम घरांच्या शोधात असलेल्या कुटुंबासाठी `गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४’ ही उत्तम संधी आहे. ती इच्छूकांनी चुकवू नये, असे आवाहन श्री. मेहता यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे