ब्रेकिंग
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहस्थळावरून दोन जणांना घेण्यात आले ताब्यात…
अमित जाधव - संपादक
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहस्थळावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विवाह सोहळ्यात बेकायदेशीर घुसल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. लुकमान मोहम्मद शफी शेख (वय 28) असे या व्यक्तीचे नाव असून तो विरारमधला व्यापारी असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव व्यंकटेश अलुरी (वय 26) असून तो आंध्र प्रदेशमधील युट्यूबर असल्याची माहिती मिळाली आहे.