दिव्यात 2009 मधील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला अखेर ठाणे कोर्टाने पुन्हा ७ वर्षाची शिक्षा…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १० ऑक्टो : मुंब्रा पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1144/2021 भ द वि 363, 354, 342, 506 सह पोस्को कलम 8,12 प्रमाणे ठाणे न्यायालय विशेष केस 57/2022 नुसार गणेश बाळाराम पाटील वय 41 वर्ष रा. साबेगाव, दिवा, ठाणे यास दुसऱ्यांदा ७ वर्षाची सजा लागली आहे.
सविस्तर पीडित मुलगी वय 11 वर्ष ही साबेगाव दिवा येथे शाळेसमोर खेळत असतांना नवीन बिल्डिंगचे बांधकाम चालू असलेल्या जागेकडे घेऊन गेला व तिच्यावर आरोपीने पीडितेचा बालपणाच्या गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे ह्या आरोपीने 2009 मध्ये 8 वर्षाच्या मुलीसोबत अश्याच प्रकारचा अत्याचार करून गुन्हा केला होता त्या गुन्ह्यात सुद्धा 7 वर्ष कारावासाची शिक्षा झाली असताना शिक्षा भोगून बाहेर आल्यावर काही वर्षांनी 2021 मध्ये परत लैंगिक गुन्हा केला आहे त्यामध्ये ही माननीय न्यायालयाने दोषी ठरवून ७ वर्षाचा सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे न्यायाधीश मा. दिनेश देशमुख जिल्हा न्यायाधीश (पोक्सो) अंतर्गत सरकारी अभियोकता संध्या म्हात्रे तपासी अधिकारी PSI शितल पाटील तसेच पोलिस हवालदार 6892 विद्यासागर कोळी यांनी कामकाज पाहिले.



