Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अभिनेत्रीने केली ७५ हजाराची चोरी…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*अभिनेत्रीने केली ७५ हजाराची चोरी*
जय बडे-प्रतिनिधी-बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता हीच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान, पाकिटमारी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यादरम्यान ही घटना घडली असून, या घटनेमुळे बंगाली मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीकडे चोरी केलेले ७५ हजार रुपये जप्त करण्यात आले असून विधाननगर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये काही पोलीस ड्युटीवर तैनात होते, त्यावेळी त्यांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकताना पाहिले. पोलिसांना तो प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिची चौकशी केली, पण तिने नीट उत्तर दिले नाही. पोलिसांनी त्यांनतर तिच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये ही रक्कम आढळून आली. या महिलेला विधानगर नॉर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी चौकशीअंती हे लक्षात आले की ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता आहे. तिने केलेल्या गुन्ह्याची अभिनेत्रीने कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत आणि रुपा दत्ताला कोर्टात हजर केले जाणार आहे. अभिनेत्री रुपा दत्ताने हिने बंगाली मालिका, चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आणि ड्रग सप्लाय करण्याचे आरोप केले होते, त्यावेळी ती चर्चेत आली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे