डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू तथा जागतिक बौद्ध सघटनेचे महासचिव आयु.राजरत्न अशोकराव आंबेडकर दिव्यात दाखल होताच सम्यक समता मंडळ (दिवा) कडून सत्कार….
अमित जाधव-संपादक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू तथा जागतिक बौद्ध सघटनेचे महासचिव आयु.राजरत्न अशोकराव आंबेडकर दिव्यात दाखल होताच सम्यक समता मंडळ (दिवा) कडून सत्कार….
आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा -दिवा शहर यांच्या वतीने ठाणे जिल्हा आयोजित बौद्ध धम्म दिक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात सुमित हॉल, दिवा (पूर्व ) येथे पार पाडला.दिव्यातील शेकडो बौद्ध बांधवांनी धम्म दीक्षा घेऊन बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सम्पूर्ण भारतभर करू असे स्पष्ट केलं सदर कार्यक्रमात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जागतिक बौद्ध संघटनेचे महासचिव आदरणीय आयु. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांचे दिवा शहरात आगमन झाल्याबद्दल स्वागत करताना सम्यक समता मंडळाचे कार्यकर्ते डावीकडून मंडळाचे सह खजिनदार:-आयु. विजय कांबळे, अध्यक्ष आयु. अभिषेक अशोक जाधव*, खजिनदार तथा वंचित बहुजन आघाडी दिवा शहरप्रमुख-आयु.मिलिंद गवई, जाहिरात आणि संपर्क प्रमुख- आयु. नितीन आवाडे व दिव्यातील तमाम बौद्ध बांधव उपस्थित होते.


