दिवा खर्डी गावातील समाजसेवक स्व.भरत कृष्णा अलिमकर यांच्या जयंती निमित्त मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप…..
अमित जाधव - संपादक
दिवा – दिव्यातील समाजसेवक व व्यवसायिक स्व.भरत कृष्णा अलिमकर यांच्या जयंती निमित्त आज विविध सामाजिक उपक्रम शाळे मध्ये राबविण्यात आले. रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे व रॉयल ब्रदर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अभिजित अलीमकर व आदित्य अलिमकर यांच्या सौजन्याने खर्डी गाव व फडके पाडा या गावातील ठाणे महापालिकेच्या 84,85 या मराठी शाळे मधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.तसेच शिक्षकांना देखील विशेष भेट वस्तू देत सन्मानित करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ दिवा चे अध्यक्ष हर्षद भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळा क्रमांक 85 मधील मुख्यद्यपिका पूजा चव्हाण व विनोद सुरलकर सर यांनी यावेळी बोलताना कै.भरत अलिमकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जयंती निमित्त अलिमकर बंधूंनी सामाजिक वसा हाती घेत विद्यार्थांसाठी शैक्षणिक वस्तूंचे वाटप करत उत्कृष्ठ उपक्रम राबविला आहे असे त्यांनी स्पष्ट करत आभार मानले.
प्रसंगी विजय पावले,अजय बुरुड,सूचित पाटील ,विकी दातीलकर,दिपेश मुंडे,सुरेश म्हात्रे,राज अलिमकर,केवळ म्हात्रे,योगेश दातीलकर,शुभम अलिमकर ,दुर्गेश मुंडे,सौरव म्हात्रे,प्रज्वल म्हात्रे, अर्थव म्हात्रे आदी मित्र वर्ग यावेळी उपस्थित होते