बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

“आम्ही विक्रोळीकर” च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय वाचविण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण,विक्रोळीत हजारो नागरिकांचा उपोषणास उस्फुर्त प्रतिसाद…

अमित जाधव-संपादक

विक्रोळी – पुर्व स्थित क्रां.महात्मा ज्योतिबा फुले मनपा हॉस्पिटलचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली गेली 05 वर्ष रुग्णालयामध्ये फक्त OPD चालू आहे. म्हाडा व मुंबई महानगरपालिका यांच्यातील जागाहस्तांतरण या विषयामुळे हा पुनर्विकास थांबलेला आहे त्यामुळे विक्रोळीतील तसेच कांजूर, भांडुप येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच रुग्णालयाच्या गैरसोयीमुळे नागरिकांना त्यांचे प्राण देखील गमवावे लागले आहेत. मागील काही वर्ष यासंदर्भात सातत्याने म्हाडा व बीएमसी यांच्याशी पाठपुरावा केला असता दाद न मिळाल्याने विक्रोळीतील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन “आम्ही विक्रोळीकर” या नावाखाली बेमुदत साखळी उपोषण दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 पासून सुरु केले आहे व या साखळी उपोषणाला विक्रोळीतील हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपोषणासाठी संतोष देसाई,योगेश भालेराव,विजया वाघमारे,इशा ठाणेकर,श्रुती घोगळे,सचिन शिवलकर,बाळा साळवी,चंद्रकांत निर्भवणे,मनोज बासुतकर,शीतल आमरे,मुरलीधर लोखंडे,शारिख कुरेशी हे बसले आहेत, तसेच हजारो नागरिकांनी भेट देऊन स्वाक्षरी करून या उपोषणाला पाठिंबा देऊन आपली साथ असल्याचा विश्वास दिला व उपोषण कर्त्याना पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे