2 लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला
दोन लाख अंगणवाडी सेविकांचा मार्च महिन्याचा पगार रखडला आहे. एप्रिल महिला संपत आला तरीही अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे पगार नसल्याने कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न सेविकांना पडला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सेविकांचा तत्काळ पगार करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे