बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा शहरात भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दशअवतार नाटकास कोकणवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद…

अमित जाधव - संपादक

 

दिवा:-ठाणे शहर आमदार संजयजी केळकर कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दिवा शहर व सिंधुदुर्ग रहिवाशी संघ,बेडेकर नगर,दिवा आयोजित दशावतार नाटकाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली.
ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ भांडुप यांचे पौराणिक दशावतार नाटक देव झाला डफली वाला या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आयोजक दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे,महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार,कल्पना पाटील,व गणेश नेवगे,उमेश घोगळे सिंधुदुर्ग रहिवाशी संघ बेडेकर नगर यांनी प्रोग्रॅम चे आयोजन केले होते यावेळी व्यासपीठावर प्रिया ठाकूर,विनोद भगत,ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर,अशोक पाटील,अंकुश मढवी, सरचिटणीस समीर चव्हाण,युवराज यादव,सचिन भोईर, रोशन भगत, जयदीप भोईर,श्रीधर पाटील,अजय सिंग अवदराज राजभर, विरेद गुप्ता, प्रशांत आंबोणकर वार्ड अध्यक्ष नागेश पवार,प्रकाश पाटील, अमरनाथ गुप्ता,जीलाजित तिवारी,राजश्री मुंडे,रेश्मा पवार,गणेश गुप्ता,अजिंक्य पाटील,मिथिलेश दुबे,हरिओम पांडे,विनय तिवारी,शंभू यादव,दीपक दुबे,वीरेंद्र गुप्ता,संतोष उपाध्याय,आदी मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे