Breaking
ब्रेकिंग

दिव्यात जॉब च्या बहाण्याने महिलेची 9 लाखाला फसवणूक…

0 2 0 9 0 8

ठाणे, दिवा ता २४ मार्च :

मुंब्रा पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम दि.28.02.2024 रोजी सकाळी 09.57 वा. ते दि.03.03.2024 रोजी पावेतो, फिर्यादी महिला, वय 26 वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा. दिवा, पूर्व यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हॉट्स अॅपव टेलिग्राम वर मॅसेज करून पार्ट टाईम जॉब करून पैसे मिळण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर आनलाईन टास्क स्किमची लिंक पाठवून वेगवेगळे टास्क पुर्ण करण्यासाठी एकुण 9,02,500/- रूपये रक्कम विविध युपीआय आयडीवर ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा रजि. नं. ।। 1064/2024 भा.द. वि. कलम 419,420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि/ श्री. पगार हे करीत आहेत. जनसंपर्क अधिकारी, पोलीस आयुक्तालय,

  1. ठाणे शहर
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे