आपला ताफा जाताना झालेला अपघात पाहून रस्त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवली गाडी….
अमित जाधव - संपादक
नागपूर.आज झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या स्थळी मुख्यमंत्री गेले होते. तिथे आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ मुख्यमंत्र्यांच्या समोर एक अपघात झाल्याचे चित्र त्यांना दिसलं .त्या ठिकाणी अपघातामध्ये एका ट्रक आणि बाईकची धडक झाली बाईकचा त्यासोबत त्याचवेळी त्या ट्रकला एक सेंट्रो कार धडकली सेंटर कारला एक बस धडकली. त्यात काही जण जखमी झाले मात्र जो बाईक चालवत होता तो तरुण ट्रक खाली अडकला होता. गंभीर अवस्थेत होता. जमाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता मात्र त्याला कोणी मदत करत नव्हतं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणची गर्दी आणि तो अपघात पाहताच त्यांचा ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी स्वतः खाली उतरले त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला त्या ट्रकच्या खालून काढायला लावलं. त्याचा पाय गंभीर असे जखमी होता तिथे ॲम्बुलन्स बोलवण्यात आली आणि त्या त्या जखमी तरुणाला रुग्णवाहिकेत घेऊन टाकून मुख्यमंत्री ते स्वतः रवी नगर चौकातील सेन गुप्ता च्या रुग्णालयात त्या तरुणाला घेऊन आले. त्या ठिकाणी त्या तरुणाला दाखल करण्यात आल असून उपचार सुरू आहे तरुणाला रुग्णालय दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केली तसेच इतर जखमी रुग्णांना या ठिकाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनंतर त्या जखमी रुग्णांना या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा त्या ठिकाणी थांबला नसता तर तो गंभीर अवस्थेतला तरुण त्याच्या जीविताला बरे वाईट होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी एनवेळी तत्परता दाखवून त्या तरुणाला तिथून काढून रुग्णवाहिका बोलून रुग्णालयात आणून दाखल केले.