Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या लोकलची अचूक माहिती ‘यात्री” ॲपच्या माध्यमातून उपलब्ध….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मुंबई : लोकल किती वेळेत पोहोचणार, पावसाळ्यात विलंबाने धावण्यामागील कारण यासह बरीच माहिती आता ‘यात्री’ ॲपच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्वरित मिळणार आहे. मध्य रेल्वेचे ‘यात्र” ॲप बुधवारी अद्ययावत झाले. त्यामुळे प्रवाशांना अचूक माहिती मिळू शकेल असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.प्रवाशांना मध्य रेल्वेच्या लोकलची अचूक माहिती ‘यात्र” ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व लोकल गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याची चाचणी बेलापूर-खारकोपर मार्गांवर दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर बुधवारपासून हे ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. यामध्ये लोकलची सध्यस्थिती समजणार आहे. लोकल स्थानकात किती वेळात पोहोचणार, कोणत्या स्थानकादरम्यान याची अचूक माहिती मिळेल. त्याचबरोबर पावसाळ्यात  पूरसदृश्य स्थितीमुळे  विस्कळीत होणाऱ्या लोकलची माहितीही प्रवाशांना ॲपच्या माध्यमातून मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय मासिक, त्रैमासिक पास, वार्षिक पासचे दर, प्रवाशाना आकारण्यात येणारे दंड, रेल्वे स्थानकातील सुविधा, मेगाब्लॉक, पार्सल सुविधा, आपत्कालीन संपर्क इत्यादी माहिती ॲपवर मिळणार आहे. हे ॲप प्रवाशांना प्लेस्टोअरमधून मोबाइलमध्ये डाउनलोड करावे लागेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे