Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या आजीच शिवरायांप्रती अपार प्रेम व आदर,वयाच्या ७६ वर्षी तीन वेळा रायगड किल्ला केला सर….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिंडनेर्ली: डोक्यावरी कोल्हापुरी फेटा, एका हातात काठी घेऊन रायगडाची प्रत्येक पायरी चढताना हृदयामध्ये महाराजाच्या विषयी अपार प्रेम, आदर व मुखामध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष करीत दिंडनेर्ली (ता.करवीर) येथील ७६ वर्षाच्या आऊ आजीने रायगड सर केला. आऊबाई भाऊ पाटील यांचा सळसळता उत्साह, जोश आजच्या तरुणाईला ही लाजवेल असाच होता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आजीचे छायाचित्रण सुरू होते तर आजी देत असलेल्या महाराजांच्या घोषणांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना उत्साह मिळत होता.ज्या वयात मंदिरे, धार्मिक स्थळे तीर्थयात्रा करायची त्या वयात आऊबाईंनी १० किल्ले सर केले आहेत. मात्र, राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड सर करतानाचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.अनेकांनि  दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देत आजींनचे अभिनंदन केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे