दिवा प्रभाग समितीकडून नवीन वर्षाच्या दोन तारखे पासून अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 3 जाने : दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज पुन्हा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई श्री. मनीष जोशी, उप आयुक्तपरी मंडळ- १ व श्री. अक्षय गूढधे, सहाय्यक दिवा प्रभाग समिति यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी प्रभाग क्र. २८ मधील श्लोक नगर फेज २, विराज अपार्टमेंट लगत, दत्तमंदिर जवळ, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा पुर्व येथील तळ + १ मजल्याचे अनधिकृत अंशतः व्याप्त इमारत रिक्त करून सदर अनधिकृत बांधकाम श्री.मनीष जोशी, उप आयुक्त परीमंडळ- १ व श्री. अक्षय गूढधे, सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनखाली यंत्रसामुग्री च्या सहाय्याने तोडण्याची कारवाई करण्यात आली. यापुढेही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत राहणार आहे असे सहायक आयुक्त यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.