बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवेकर “मलई” खात असाल तर सावधान…अस्वच्छ जागवेर बनविल्यामुळे अनेकांच्या आरोग्यास धोका,ठाणे अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष….

अमित जाधव-संपादक

दिवेकर “मलई” खात असाल तर सावधान…अस्वच्छ जागवेर बनविल्यामुळे अनेकांच्या आरोग्यास धोका,ठाणे अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष….

दिवा (प्रतिनिधी) दिवा येथे विक्री करण्यात येणाऱ्या मलई या अत्यंत अस्वच्छ जागेत बनविल्याच्या प्रकार आज म्हात्रे गेट येथील एका बिल्डींगमध्ये उघडकीस आला आहे.याबाबत दिव्यातील पत्रकारांनी स्टींग आँपरेशन करुन मलई बनविण्याचा आजूबाजूचा अस्वच्छ परिसर अऩेकांच्या आरोग्यास धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
दिव्यातील अनेक ठिकाणी हातगाड्यांवर मलई विकली जाते.दिसायला सुंदर तसेच चवदार लागते.सर्वाधिक या मलईचे ग्राहक हे लहान बालके आहेत.या बालकांना ही मलई देण्यात येते.मात्र ही मलई ज्या ठिकाणी बनविली जाते त्या ठिकाणचा परिसर अत्यंत गलिच्छ आणि घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून आले आहे.यातील खोली ही चिखलाने माखलेली होती.सांडपाणी इतरत्र पडलेले पहावयाला मिळाले.
त्यामुळे अश्या पद्धतीत बनविलेली मलई ही लहान बालकांसह सर्वांनाच आरोग्यासाठी धोकादायक बनली आहे.त्यामुळे अश्या विक्रेत्यांवर अन्न आणि प्रशासन विभागाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे