पद्मश्री डॉ. श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…
अमित जाधव-संपादक
पद्मश्री डॉ. श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन*
पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक १५/०५/२०२२ रोजी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या तर्फे डोंबिवली परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात एकुण १०२७ श्री सदस्यांनी सहभाग घेतला. स.वा. जोशी विद्यालय (डोंबिवली पूर्व) येथे सकाळी ०८:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी डोंबिवली विभागातील श्री सदस्यांनी तसेच इतर नागरिकांनीही सहभाग घेतला.
ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी निरूपणाच्या माध्यमातुन आरोग्य शिबीर, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संतुलन, वृक्ष लागवड व संवर्धन स्वच्छता अभियान, विविध सरकारी दाखले वाटप, स्मशान भूमी, दफन भूमी स्वच्छता, जलपुर्नभरण, श्रवणयंत्र वाटप, पोलिसांना बॅरिअर गेट्सचे वाटप यासारखे उपक्रम करून समाज प्रभोधनाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे सुरु ठेवताना पद्मश्री.डॉ श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने रक्ताचा असलेला तुटवडा विचारात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात डोंबिवली परिसरातील राजकीय, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते व त्यांनी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या शिबिराचे कौतुक करून धन्यवादही दिले .