बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्याना ऍड आदेश भगत यांचा खोचक उत्तर ,कल्याण लोकसभेची उमेदवारी शिवसेनेच्या डॉ.श्रीकांत शिंदेनाच मिळणार*- अँड.आदेश भगत, शिवसेना उपशहरप्रमुख

अमित जाधव - संपादक

कल्याण लोकसभेत भाजप च्या कमळ चिन्हाशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही अशी फुशारकी मारणाऱ्या दिवा भाजप ने आपल्या कुवती प्रमाणे व्यक्तव्य करावीत असा जोरदार टोला शिवसेना दिवा शहराचे उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांनी लगावला आहे.

प्रसारमाध्यमांच लक्ष वेधण्यासाठी आणि आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी दिवा भाजप असले तथ्यहीन दावे करत असल्याचे मत अँड आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे.
दिवा शहरात शिवसेनेचे कार्य मोठे आहे आणि प्रचंड जनसंपर्क देखील आहे. त्यामुळे दिवा शहरात प्रचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत भाजप कडे दुर्लक्ष केल जाईल या भीतीने दिवा भाजपचे पदाधिकारी केवळ लक्ष वेधण्यासाठी असल्या तथ्यहीन मागण्या करत आहेत आणि ही बाब भाजप पक्ष श्रेष्ठींना देखिल माहिती असल्याने तेही यांच्या मागणी कडे दुर्लक्षच करतील असा ठाम विश्वास अँड आदेश भगत यांनी व्यक्त केला आहे.
वास्तविक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा कामाचा आवाका आणि प्रचंड जनसंपर्क लक्षात घेता त्यांच्या तोडीस कोणत्याही पक्षाकडे सांगायला उमेदवार शिल्लक नाही. मागील लोकसभा निवडणुकीत लाखांच्या फरकाने जिंकणारे डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी महाराष्ट्रात सर्वात विक्रमी मताने जिकणारे उमेदवार असतील यात शंका नाही. दिवा शहरात कुणी कितीही आदल-आपट केली तरीही दिवा शहरातून पडलेल्या एकूण मतदानाच्या ८०% पेक्षा जास्त मतदान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना म्हणजेच ‘धनुष्यबाण’ या चिन्हाला मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला असल्याचे अँड.आदेश भगत यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे