Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासावरही विशेष भर द्यावा : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

*⭕️विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासावरही विशेष भर द्यावा : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे.*

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन

ठाणे (१० मार्च, संतोष पडवळ ): व्यक्तिमत्व विकास म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास असून यामध्ये शारीरिक व मानसिक सदृढता महत्त्वाची आहे. व्यक्तिमत्व विकासात नेतृत्वगुण, एकात्मता व बंधुभाव हे सर्वात महत्त्वाचे घटक असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर द्यावा असे मत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेस शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार ठाणे शहरातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ”व्यक्तिमत्व विकास” या विषयाबाबत ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.

यावेळी बोलताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी युध्दकाळात अंमलात आणलेल्या अनेक युक्त्या, गनिमीकावा, दूरदृष्टिकोन, सकारात्मकपणा अशा अनेक गोष्टींचा प्रामुख्याने विचार केल्यास, आपण आपला व्यक्तिमत्व विकास करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दकौश्ल्याचा दूरदृष्टिकोन अंमलात आणून आपण चांगले यश संपादन करु शकतो तसेच आपला व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारे करू शकतो.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे हे नांदेड जिल्हाचे सुपूत्र असून, ते एक उत्तम वक्ता, अध्यात्मवादी, योग अभ्यासक व उत्तम लेखक आहेत.” प्रवास स्वप्नपूर्तीचा ” या बेस्ट सेलर पुस्तकाचे ते लेखक आहेत. तसेच महात्मा जोतिबा फुले शिक्षक परिषद आयोजित शिर्डी येथील कार्यक्रमात त्यांना “प्रबोधन रत्न” पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे अन्वेषण) अनिल देशमुख आणि व नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदिप माळवी, उप आयुक्त मनिष जोशी व संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष व्याख्यान यशस्वीरीत्या पार पाडणेकरीता चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी / कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली असून संस्थेचे गिरीश झेंडे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे