Breaking
ब्रेकिंग

शासनाने निर्गमित केलेली शाळेची वेळ दिव्यातील पालकांना अमान्य, पालकांचा मुख्यद्यापिकाना घेराव…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता २५ जून : दिवा पश्चिमेकडील ठाणे महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळेची वेळ बदलण्यासाठी पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना घेराव घातला होता. प्रसंगी शिवसेना दिवा उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांनी मध्यस्ती करत पालकांना सकारात्मक आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक विभागाच्या शालेय विध्यार्थ्यांना पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सकाळच्या ऐवजी दुपारी भरविण्याचे आदेश दिले आहेत कारण लहान मुलांची झोप होत नसल्याने त्यांच्या मध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढलेले असल्याने हा शासकीय जि आर काढण्यात आलेला आहे. सदरच्या शालेय जि आर मुळे दिव्यात पालक वर्गात नाराजी दिसून आली आहे. तर या नवीन जि आर संदर्भात मा शैलेश पाटील यांनी दिवा पश्चिमेला असणाऱ्या पालिका शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापक व पालकांची बाजू ऐकून घेतली व पालकांची ही समजूत काढून तुमचा प्रश्न आम्ही संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे मांडून यावर योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे. प्रसंगी शिवसेनेचे उमेश भगत, भालचंद्र भगत यांच्यासह अनेक कार्यकर्ते व अनेक पालक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे