वर्धा आणि चंद्रपूर येथील पूरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी – बाबूभाई भावानजी
अमित जाधव-संपादक
वर्धा आणि चंद्रपूर येथील पूरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी – बाबूभाई भावानजी
मुंबई – गणेश हिरवे
वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून नागपुरात पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे (1) 1.35 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान दुबार पेरणी सुद्धा वाया गेली, अशी स्थिती आहे. केवळ 40 ते 45 टक्के ठिकाणीच पेरणी पुन्हा होऊ शकते, कारण इतर ठिकाणची जमीन खरडली गेली आहे.
(2) गेल्यावेळी झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकर्यांना मिळालेच नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे आता मदत जाहीर करताना तो भाग सुद्धा विचारात घ्यावा लागेल.(3) सिंरोचात मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा ..यापूर्वी सुद्धा दौरा केला. तेथे अनेक गावांची कनेक्टिव्हीटी तुटते. त्यामुळे यासाठी दीर्घकाळ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
(4) सर्व नागरिकांना विनंती आहे की, बुस्टर डोस प्रत्येकाने अवश्य घ्यावा. कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानेच भारतातील स्थिती चांगली आहे. त्यामुळे बुस्टर डोस प्रत्येकाने घ्यायचाच आहे.
(5)अतिवृष्टी आणि पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अतिशय व्यवस्थित, संवेदनशीलतेने आणि वस्तुनिष्ठपणे करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकर्यांच्या कर्जपुरवठ्यासाठी निकराने प्रयत्न करावेत. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होते, त्याचेही नियोजन करावे अशी मागणी मुंबईचे माजी उपमहपौर बाबूभाई भवानजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


