मूर्ती लहान पण कीर्ती महान..!महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धेत पुणे येथे चमकलेली दिव्यातील आर्या वायले हिची धूमधडक्यात मिरवणुक..
महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धेत पुणे येथे चमकलेली दिव्यातील आर्या वायले हिची धूमधडक्यात मिरवणुक
दिवा (प्रतिनिधी) महाराष्ट्राची सौदर्यवती स्पर्धेत बाल श्रेणीतून द्वितीय क्रमांकाने चमकलेली दिव्यातील कु.आर्या संदिप वायले हीची आज कुटूंबियांतर्फे दिवा शहरातून विशेष मिरवणुक काढण्यात आली.दिव्यातील ग्लोबल शाळा ते आगासन फाटक या परिसरातून जात असताना दिव्यातील नागरिकांनी तिला भरभरुन
अभिनंदन आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
आर्या वायले हि दिव्यातील प्रसिद्ध व्यवसायिक श्री संदिप वायले यांची सुकन्या आहे.ती ११ वर्षाची असून आर्या इंग्लिश स्कूल या शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे.मागील आठवड्यात पुणे येथे महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 30 जणींचा सहभाग होता. बाल श्रेणीमध्ये कु.आर्या वायले हिने द्वितीय क्रमांकाचा मुकूट, सन्मानचिन्ह तसेच ५ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकून दिव्याचे नाव रोशन केले आहे.तिच्या या यशाबद्दल ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि माजी नगरसेवक श्री शैलेश पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.आज कुटूंबियांतर्फे काढलेल्या मिरवणुकीत आर्या हिला भेटून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.



