Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरात खासदार क्रीडा संग्राम स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांच्या पुढाकाराने आयोजित ”खासदार क्रिडा संग्राम  स्पर्धेचा रविवारी प्रारंभ झाला. शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे या स्पर्धेचा अत्यंत साधेपणाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीचेही मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा शहराच्या दिवा महोत्सव मैदानात या स्पर्धा होत आहेत. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध रॅपर मिटोराईड छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शौर्यगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली व आज पहिल्याच दिवशी सहा बॉक्स क्रिकेट सामने प्रकाशझोतात खेळविण्यात आले असे दिवा उपशहर प्रमुख आदेश भगत यांनी यावेळी बोलताना सागितले.उपशहरप्रमुख शैलेश पाटील, आदेश भगत, विभाग प्रमुख निलेश पाटील, अर्चना पाटील, मा.नगरसेवक दीपक जाधव , सुनिता गणेश मुंडे , मा.नगरसेवक अमर पाटील, मा.नगरसेविका दिपाली उमेश भगत व दर्शना चरणदास म्हात्रे, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, शशीकांत पाटील,भालचंद्र भगत, विनोद मढवी, युवा अधिकारी साक्षी मढवी, जगदीश भंडारी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे