0
2
0
9
7
4
मुंबई -बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. साराभाई VS साराभाई या मालिकेतून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांनी जाने भी दो यारो, ये जो है जिन्दगी, फना, कल हो ना हो, ओम शांती ओम यासह 50 पेक्षा जास्त सिनेमात काम केले.
0
2
0
9
7
4



