दिव्यात मुंब्रा देवी कॉलनीत गॅस सिलेंडर लिकेजमुले संपूर्ण घराला लागली आग…
अमित जाधव - संपादक
आज दिनांक २५/१०/२०२५ रोजी १०:०२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- शीळ अग्निशमन केंद्र)* गणेश प्लाझा इमारत, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा. या ठिकाणी *गणेश प्लाझा इमारत (तळ+०६ मधली इमारत)* या इमारतीच्या *तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक:-३०४ (मालक:- श्री. राहुल पंडित)* या रूम मधील भारत गॅस सिलेंडरचा नोझल लिकेज होऊन आग लागली होती. *सदर घटनास्थळी टोरंट पॉवरचे कर्मचारी, भारत गॅस कंपनीचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी लिकेज असलेला गॅस सिलेंडर भारत गॅस कंपनीचे कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.सदर घटनास्थळी लागलेली आग स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.



