Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या प्रभागातील नागरीकांनी पाहिला विनामुल्य ‘ धर्मवीर ‘ चित्रपट !

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यातील मा.नगरसेवका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या प्रभागातील नागरीकांनी पाहिला विनामुल्य ‘ धर्मवीर ‘ चित्रपट !

 

दिवा – स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचा वादळी जिवन पट इतका प्रचंड आणि दिशादर्शक आहे की तो केवळ मात्र ३ तासात दाखविणे शक्यच नाही, त्यासाठी धर्मवीर चित्रपटाचे अनेक भाग निर्माण करावे लागतील अशा या ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे ‘ या चित्रपटाचा विनामुल्य शो दिव्यातील मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सौजन्याने डोंबवली पश्चिमेतील मधूबन सिनेमा गृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता .हा शो हाऊस फुल्ल झाल्याचे चरणदास म्हात्रे यांनी सांगितले .

सुप्रसिद्ध सिने निर्माते आणि अभिनेते प्रविण दरडे यांनी निर्मिती केलेल्या आणि सिने अभिनेते प्रसाद ओक यांची धर्मवीर आनंद दिघे यांची भूमीका असलेला ‘ धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे ‘ या चित्रपटाचा खास शो मा.नगरसेवका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांनी मंगळवारी (ता. २४ )डोंबवली पूर्वेतील मधूबन सिनेमा गुहा मध्ये स्व : खर्चाने नागरीकांसाठी विनामुल्य आयोजित केला होता . प्रभागातील नागरीकांसह हा चित्रपट पाहिल्या नंतर सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांनी सांगितले की धर्मवीर आनंद दिघे हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या घराघरात पोहचलेले असे व्यक्तीमत्व होते .त्यांच्या अल्पशा जिवनात त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर त्यांची पक्कड मजबूत होती आणि त्या मुळेच शिवसेनेच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण केले होते.
तर शिवसेना उपविभाग प्रमुख चरणदास म्हात्रे यांनी सांगितले की आनंद दिघे यांचे कर्तत्व महान होते म्हणूनच त्यांच्या जिवनावरील चित्रपट पहाण्यास त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी दिसून येत आहे .धर्मवीर हा चित्रपट विनामुल्य दाखविल्या बद्दल आनंद दिघेंच्या
शिवसैनिकांनी व जैष्ठ बांधवांनी मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे