दिव्यात बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाची दंडात्मक कारवाई,संघटनेचे मात्र भाडेवाढीवर दुर्लक्षच…
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता २१ : दिवा रेल्वे स्थानक पूर्व येथील बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रवाश्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असून त्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहे. स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालक नियोजित स्टँडच्या पुढे रेल्वेच्या सरकत्या जिन्यासमोर रिक्षा उभ्या करत असल्याने पादचाऱ्यांना चालणं देखील अडचणीचे होत असून रिक्षा युनियन संघटना नियमानुसार तीन प्रवासी घेऊन न जाता चौथ्या सीट देखील घेऊन जात असल्याची काही बातमी काही दिवसापूर्वीच वर्तमान पत्रामध्ये आली असता याचीच गंभीर दखल घेत आज या प्रकरणी मुंब्रा वाहतूक उपविभागाकडून अनेक रिक्षा चालक व मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण १ लाख ७० हजार रुपये दंड आकरण्यात आला आहे. अशीच कारवाई वेळोवेळी व्हावी व अनेक मुजोर रिक्षा चालकांना वठणीवर आणावे असे दिवावसियानी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
संघटनानेने देखील यात लक्ष घालून वाढलेले प्रवासी भाडे दराचे व्यवस्थित रित्या नियोजन करून प्रवसियांवार लादलेल्या आर्थिक भरावर नियंत्रण आणावे असेही यावेळी काही ज्येष्ठ नागरिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे