ब्रेकिंग
समाधान नागर येथे पाण्याची त्रीव टंचाई, दिव्यात पाणी माफियांवर कारवाई करण्यासाठी दिवा मनसे चे आयुक्तांना निवेदन..
अमित जाधव - संपादक
दिव्यातील समाधान नगर मध्ये गेले एक वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील रहिवासी मेटाकुटीला आले आहे याचीच दाखल घेत रहिवाश्यांना सोबत घेऊन दिवा मनसे कडून दिवा प्रभाग समिती कडे पाठपुरावा करण्यात आला होता. पण अधिकृत नळ जोडण्या असूनही लोकांना पाणी मिळत नाही पण पाणी विकणाऱ्याना मात्र हे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अशा बेकायदेशीर पाणी विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आणि समाधान नगर मधील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आज मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री.अभिजित बांगर यांची भेट घेऊन तसे निवेदन दिले.
यावेळी त्यांच्या सोबत शहर सचिव प्रशांत गावडे, महिला शाखाध्यक्ष निकिता सालप , शाखाध्यक्ष सागर तळेकर आणि तेथील रहिवाशी अमित गोमाणे, शैलेश कलंबटे हे सर्व उपस्थित होते.