नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 2 उमेदवार विजयी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले….
अमित जाधव - संपादक
नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 2 उमेदवार विजयी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचा अभूतपूर्व विजय
नागालँडमध्ये आर पी आय चा निळा झेंडा फडकला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,आझाद मैदानात आनंदोत्सव
मुंबई दि. 2 – नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर- 2 विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. इम्तिचोबा हे विजयी झाले आहेत. तसेच नागालँड च्या नोकसेन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँड मध्ये गन्ना किसान ( ऊस शेतकरी) या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक 8 ठिकाणी लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाले. अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली.
आज दि.2मार्च दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मुंबई प्रदेश तर्फे नागालँड मध्ये आरपीआय चे 2 उमेदवार विजयी झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आझाद मैदान मुंबई येथे विजयी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली.
आठवलेसाहेबांच्या मेहनतीला आले फळ नगालँड ने दिले आरपीआय ला बळ