दिव्यातील श्री साई बाबा चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी च्या च्या नेत्या सौ.रेश्माताई नरेश पवार यांचा प्रभागातील नागरिकांसोबत पाडवा साजरा……..
अमित जाधव-संपादक
दिव्यातील श्री साई बाबा चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी च्या च्या नेत्या सौ.रेश्माताई नरेश पवार यांचा प्रभागातील नागरिकांसोबत पाडवा साजरा……..
जवळजवळ हजारो नागरिकांना पुरणपोळी पॅकेट वाटप….
श्री साई बाबा चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी च्या दिवा शहर च्या रेश्मा नरेश पवार यांच्या कडून गुढीपाडवा व हिंदूनववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रभागातील नागरिकांसाठी घरोघरी जाऊन पुरणपोळी वाटप कार्यक्रम आयोजित केला जवळजवळ हजारो महिलाना यावेळी त्यांनी पोळ्यांचे वाटप केले व पाडव्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करून शुभेच्छा दिल्या.
अनेक महिलांनी यावेळी सौ.रेश्माताई नरेश पवार यांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.सामाजिक कार्यासाठी त्या नेहमी तत्पर असून नरेश्मा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना त्यांनी सहकार्य केले आहे असे यावेळी काही जैष्ठ नागरिकांनी सांगितले.
महिलांसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत असून दिव्यातील प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी यासाठी त्यांना बचत गटांच्या माध्यमातून मी नेहमीच सहकार्य करून त्यांना एक मदतीचा हात देऊ करते असे त्यांनी बोलताना स्पष्ट केलं व दिव्यातील सर्व नागरिकांना पड्याच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.