0
2
0
9
7
4
बॉलिवूड अभिनेता गोविंदाला गोळी लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी पिस्तूल साफ केल्यानंतर अलमारीत ठेवताना खाली पडल्याने त्यातून गोळी झाडली गेली, यावेळी गोविंदाच्या पायाला गुडघ्या खाली गोळी लागली. सध्या गोविंदाच्या पायातून गोळी काढण्यात आली असून त्यांच्या जिवाला कोणताही धोका नाही. घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिली.
0
2
0
9
7
4



