दिवा साबे रोडवरील पाण्याच्या भीषण टंचाईने नागरीक त्रस्त,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांनी नागरिकांन सहित घेतली सहायक आयुक्तांची भेट…..
अमित जाधव-संपादक
*दिवा साबे रोड येथील राधे कृष्ण सोसायटी येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी व अन्य समस्यांनसाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांनी शेकडो नागरिकांसोबत घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट
भा.ज.पा महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा मोर्चा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या पुढाकाराने दिवा साबे रोड येथील राधेकृष्ण सोसायटी मधील जवळ जवळ 500 कुटुंबांना मागील 6 महिन्यांपासून भेडसावणारा पाणी प्रश्न , तसेच दिवा साबे रोड येथील रस्त्यावर बंद असलेले पथदिवे अश्या मूलभूत समस्या शेकडो नागरिकांना सोबत घेऊन दिवा प्रभाग समिती मधील सहायक आयुक्त फारुख शेख यांच्या समोर मांडण्यात आला , या वेळी ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर , मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे , संघटक सरचिटणीस दिलिप भोईर , सरचिटणीस समीर चव्हाण , ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत , व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर , महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील , सीमा भगत , अंकुश मढवी , मंडळ उपाध्यक्ष निलेश भोईर , युवा मोर्चा सरचिटणीस आशिष पाटील , नागेश पवार, सुमित मढवी, दुर्गेश मढवी, दिपेश पाटिल, साईनाथ भोईर,आकाश भोईर, विपिन भोईर, प्रणव भोईर, गौरव पाटिल,आदित्य म्हात्रे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते…


