स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्योती राजकांत पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…
अमित जाधव - संपादक
दिवा:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.80 टक्के समाजकारण 20% राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार प्रभागातील नागरिकांसाठी ज्योती पाटील यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना दिव्यातील नागरिकांनी मोठ्या सख्येने उपस्थिती राहून शिबिराचा लाभ घेतला..
यावेळी शहरातील नागरिकांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड व नवीन मतदार नोंदणी शिबिर त्याचबरोबर आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश पवार, स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांनी या लोकोपयोगी उपक्रमांच आयोजन करण्यात आले होते.



