Breaking
ब्रेकिंग

दिव्यात फेरीवाला अतिक्रमण हटविण्यासाठी स्वतः सहायक आयुक्त रस्त्यावर… कारवाईस अडथळा निर्माण करणाऱ्या ऐकावर गुन्हा दाखल…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता १४ फेब्रुवारी : ठाणे मनपा हद्दीतील वाढती लोकसंख्या असलेल्या दिवा शहरात फेरीवाल्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संपूर्ण शहरातील फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले असून दरवेळी वाहतूक कोंडी होऊन नागरीक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून पायवाट काढत घर गाठत असतात. प्रकरणी अनेक तक्रारी ठाणे महापालिका अतंर्गत दिवा प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाल्यामुळे अखेर गंभीर दखल घेत सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सहायक आयुक्त स्वतः अतिक्रमण विभागाच्या टीमसह दिवा स्टेशन रोड ते मुंब्रादेवी कॉलनी रस्त्यावर येऊन कारवाई सुरु केली. संध्याकाळी ६ वाजता सुरु केलेली कारवाई रात्री ९ वाजेपर्यंत सुरु होती. प्रसंगी कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या ऐका फेरीवाल्यावर मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीसांत भादवी कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यातील रस्त्यांवर अनाधिकृतपणे रस्ता व फूटपाथवर आक्रमण करणाऱ्या फेरीवाल्या विरोधात यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असून दिवा स्टेशन रोड, आगासन रोड, दिवा चौक, दातिवली रोड, मुंब्रादेवी कॉलनी तसेच साबेगाव रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच पद पथावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविण्यात येतील यापुढे पदपाथावर जर फेरीवाल्यांनी हातगाडी किंवा कोणतेही अतिक्रमण केल्यास जागच्या जागी तोडून ठोस कारवाई करण्यात येईल व
सन २०१३ च्या टी.वी.सी. समितीच्या नियमांनुसार धोरण आखले जाईल असे दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे