ब्रेकिंग
मनसे मा.आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश, गणेशोत्सव निमित्ताने कोकणात जाणाऱ्यासाठी दिव्यातून सुटणार गणपती स्पेशल विशेष गाड्या…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नेते, मा. आमदार श्री. राजू (प्रमोद) पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, गणेशोत्सव निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या वतीने दिवा स्थानकावरून विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
🗓️ दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ ते १० सप्टेंबर २०२५ दरम्यान
🚆 गाड्या: १०६३ अप आणि १०६४ डाऊन अशा क्रमांकाच्या १९ जोडी (एकूण ३८ फेऱ्या) विशेष गाड्या
या गाड्यांसाठी IRCTC मोबाईल अॅप किंवा www.irctc.co.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षण करता येईल.याशिवाय, दिवा, कल्याण, ठाणे आणि मुंब्रा येथील आरक्षण खिडकीवर प्रत्यक्ष तिकीट आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.दिवा वासीयांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि गणेशोत्सवासाठी कोकण प्रवास सुखकर करावा असे मा.आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयातून कळविले आहे
0
2
0
9
7
4



