ठाण्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या हलगर्जी पणामुळे सहावीत शिकत असलेल्या मुलाचे तुटले बोट….
( आनंद नगर घोडबंदर रोडवरील शाळेतील घटना )
ठाणे :- ठाण्यातील आनंद नगर न्यू हॉरझन स्कॉलर शाळेतील विद्यार्थ्यांच्या हलगर्जी पणामुळे इयत्ता सहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे त्याच वर्गात शिकनाऱ्या विद्यार्थ्यांने जाणीवपूर्वक पद्धतीने दरवाज्यात हात अडकविले असता त्यानंतरही दरवाजा न-उघडता त्यात उदयन ठणके यांचे बोट तुटले आहे. तर याप्रकरणी जखमी पाल्यांनी सदरील विद्यार्थी व शाळेवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जखमी विद्यार्थी उदयन ठणके सहावी इयत्ता मध्ये शिकत असून शाळेत कम्प्युटर क्लासला जात असताना दरवाजा उघडत असताना त्या उदयन यांचे हात दरवाजा अडकून त्यात बोट तुटले तरीही दरवाजा उघडला नाही त्यात भयंकर परिस्थितीत बोट फुटले व तुटले. सदरील प्रकार शाळेच्या लक्षात आल्यानंतर शाळेंनी दोन तास विद्यार्थ्यांना हळवत ठेवले होते. यात शाळेच्या हलगर्जीपणा मोठ्या प्रमाणावर दिसून आला वेळेवर उपचार न-केल्याने डॉक्टरांनी जखमी विद्यार्थ्यांचे बोट कापावे लागणार असे सांगितले असल्याने विद्यार्थ्यांला कायमचे अपंगत्व येणार आहे. तर त्याच आर्यवीर चौहान यांनी त्याच शाळेत एका विद्यार्थ्यांचा हात मोडल्याची घटना घडली होती, तरीही त्यास शाळेचा पाठिंब्यामुळे वारंवार खोड्या करत इतरांना त्रास देण्याचे काम चालू आहे.
सदरील घटना ही न्यू हॉरिझन स्कॉलर शाळेतील इयत्ता सहावी तुकडी ई मधील घटना घडली आहे, एका चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या सोबत एवढी गंभीर घटना घडून सुद्धा सदरील शाळेचे मुख्याध्यापक यांनी पालकांना भेटण्यास नकार दिला आहे. तसेच मुलांच्या पाल्यांनी शाळेत तक्रार देत सदरील खोडी करणाऱ्या विद्यार्थी आर्यवीर चौहान ह्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदरील प्रकरणात मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सदरील प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.