दिवा, कळवा येथे अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा , अनाधिकृत बांधकाम व्यवसायिक यांच्यावर एम आर टी पी अंतर्गत होणार गुन्हे दखल..अतिक्रमण विभागाचे महेश आहेर यांनी केलं स्पष्ट..
अमित जाधव - संपादक
दिवा, कळवा येथे अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा..
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने अतिक्रमण उपायुक्त गोदापुरे आणि अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे
आज पासून ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने अतिक्रमण उपायुक्त गोदापुरे आणि अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत दिवा आणि कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्काशीत करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.
ही कारवाई सर्व म्हणजेच महापालिकेच्या ९ प्रभाग समित्यांमध्ये सर्व समित्यांचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत करण्यात येणार असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी चे गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहेत असे अतिक्रमण विभागाचे समन्वयक सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी यावेळी सांगितले.तसेच सदर अहवाल प्रसिद्ध करण्यात येईल