दिवा प्रभाग-२८ बेडेकर नगर मनसेचा महिला हळदी कुंकू मोठ्या उत्साहात संपन्न….
अमित जाधव-संपादक
दिवा प्रभाग-२८ बेडेकर नगर मनसेचा महिला हळदी कुंकू मोठ्या उत्साहात संपन्न….
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,दिवा विभाग ,बेडेकर
नगर प्रभाग क्र.२८ महिलांचा हळदी कुंकू कु.अंकिता अनंत कदम (बेडेकर नगर शाखाध्यक्ष)यांनी आयोजन केले होते या कार्यक्रमाला सौ योगिता(वहिनी)प्रमोद पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली.तसेच रंजनी काशिनाथ पाटील(वहीनी),मयुरी तेजस पोरजी(महिला विभाग आद्यक्षा),सीमा तुषार पाटील,समीक्षा समीर मार्कडे(ठाणे महिला शहर अद्यक्षा)रेश्मा नरेश पवार(समाजसेविका),अश्विनी अमोल केंद्रे(समाजसेविका)आदींनी प्रमुख उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून सन्मान म्हणून वाण देण्यात आले तसेच मान्यवर महिलांना शाल ,पुष्प गुच्छ श्रीफळ ,सन्मान चिन्ह व शिवाजी महाराजांची प्रतिमा गौरविण्यात आले.अयोजकानुसार जवळ जवळ तीनशे पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवत हळदी कुंकू यशस्वीरित्या संपन्न झाला.


