Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबईत बी के सी त पहाटे निर्मानधीन पूल कोसळला,जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल…….

अमित जाधव--संपादक

0 2 0 9 7 4

मुंबईतील बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचं काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली.

पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले.
मजूरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केलं आहे.

हा उड्डाणपूल कसा पडला, याचं कारणही अद्याप समजलेलं नाही. तसेच जखमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे