Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे धनादेश….संजयजी भोकरे यांनी भोसले यांच्या कुटुंबियांच केलं सांत्वन

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे धनादेश :

संजयजी भोकरे यांनी भोसले यांच्या कुटुंबियांच केलं सांत्वन

ज्येष्ठ पत्रकार कै.नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबायांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांनी नामदेव भोसले यांचे बंधू उद्धव भोसले आणि भोसले यांच्या कुटुंबियांच सांत्वन केले. यावेळी कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटने कडून आज पन्नास हजाराचे अर्थसहाय्य करण्यात आले. तसेच एस बी जी आय शिक्षण संस्थेच्या जर्नलिझम विभागा मार्फत पन्नास हजाराचे अर्थसहाय्य करणार असल्याचे यावेळी संजयजी भोकरे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी यासह राज्यातील सर्व भागात हा उपक्रम सर्व पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष राबवत आहे तर कोरोना काळात व वर्षभर हा उपक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे
यावेळी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, जेष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे, सदानंद औन्ध्ये, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन यादव, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे सचिव शरद सातपुते आणि संकेतराज बन्ने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे