Breaking
ब्रेकिंग

दिवा रुणवाल माय सिटी येथील रहिवाशांनी दिवा ते रुणवल माय सिटी पर्यंत ठाणे महानगर पालिकेची बस सेवा चालू करण्यासंदर्भात आमदार संजय केळकर यांची घेतली भेट…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा रुणवाल माय सिटी येथील रहिवाशांनी दिवा ते रुणवल माय सिटी पर्यंत ठाणे महानगर पालिकेची बस सेवा चालू करण्यासंदर्भात आमदार संजय केळकर यांची घेतली भेट

दिवा:- दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या रुणवाल माय सिटी येथील दहा टॉवर तयार झाले असून 1200 फ्लॅट तयार असून येथे 2000 ते 2500 लोक राहत आहेत येथील नागरिक वर्ग हा सर्वोतोपरी नोकर वर्ग असून मुंबई ला जाण्यासाठी दिवा स्टेशन हाच जवळचा पर्याय असून मुलांना सुद्धा शाळेत जाण्यासाठी कोणतीही सुविधा नाही तरी दिवा स्टेशन ते रुणवाल माय सिटी व रुणवाल माय सिटी ते डोंबिवली स्टेशन अशी ठाणे महानगर पालिकेची परिवहन सेवेची बस सेवा चालू करावी जेणे करून येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी सोय होईल असा विनंती अर्ज आमदार संजय केळकर व परिवहन सदस्य विकास पाटील यांना देण्यात आले यावेळी अस्टोरीय टॉवर च्या चेअरमेन नेहा टिल्लू प्राध्यापक नंदकुमार कुलकर्णी दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर संघटक सरचिटणीस दिलीप भोईर युवा मोर्च्या अध्यक्ष सचिन भोईर महिला मोर्च्या अध्यक्षा ज्योती पाटील वार्ड अध्यक्ष नागेश पवार मधुकर पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे