संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे अधिकारी यांना १६ हजार दिवेकरांच्या सह्यांचे निवेदन…. दिवा ते सी एस टी एम लोकल सुरू होण्यासाठी किती महत्वाचे आहे हे रेल्वे अधिकारी यांच्या आणले निदर्शनास..
अमित जाधव - संपादक
दिवा – २८ जानेवारीला मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री.राम करण यादव साहेब मध्य रेल्वेच्या पाहणी दौऱ्यात दिवा रेल्वे स्थानकाला भेट दिली असता संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री विजय भोईर व सहकाऱ्यांनी भेट घेऊन जीएम याना सोळा हजार रेल्वे प्रवाशांच्या सह्यांच्या निवेदनावर चर्चा करून दिव्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या.विशेष म्हणजे यावेळी श्री विजय भोईर संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष यांनी जीएम यांच्याही चर्चा केली. आणि वीजय भोईर यांनी यावेळी दिवा सीएसएमटी लोकल चालू होणे अत्यंत गरजेचं कसेआहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दिव्यात आरक्षण केंद्र आणि कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे तसेच सकाळच्या वेळी कल्याणहून सुटणाऱ्या जलद गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा ही मागणी देखील केली. आणि यावेळी आपल्या मागण्यांना समर्थन देण्यासाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे मॅडमही उपस्थित होत्या. त्यांनी देखील आपल्या दिव्याच्या समस्यांविषयी जीएम साहेबांशी चर्चा केली. व त्यांनी इतरही कल्याण डोंबिवलीच्या समस्यांबाबत निवेदन दिले .यात प्रामुख्याने सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळेत दिव्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी दिवा सीएसएमटी लोकल सुरू करावी कारण दिव्याच्या प्रवाशांना सकाळच्या वेळी रेल्वेमध्ये चढणे खूप जिकरीचे असते आणि बरेच वेळा अपघातही झाले आहे, ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.तसेच दिवा स्थानकातील इतरही समस्या अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी जीएम यांनीही दिव्याच्या सर्व समस्या ऐकून घेतल्याबद्दल विजय भोईर यांनी मनःपूर्वक आभारी व्यक्त केले. तसेच दिवा स्टेशन मॅनेजर श्री. गुप्ता साहेब, RPF अधिकारी श्री.तिवारी , श्री.मनोज यादव इंटेलिजन्स विभाग यांचेही आभारी आहोत की या भेटीसाठी त्यांनी देखील आम्हाला चांगले सहकार्य केले. यावेळी श्री.विनोद भगत,समीर चव्हाण,सचिन भोईर, रोशन भगत, युवराज यादव, प्रफुल साळवी,नितीन कोरगावकर, किरण कोरगावकर, रवी मुणनकर,संदेश सावंत, गोविंद घाडीगावकर इ.संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.